मुंबई – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि तिचा पती अभिनेता गुरमीत चौधरी हे दोघे सोशल मीडियावर सक्रिय आहेत. दोघेही दोन मुलांचे पालक असून त्यांचे अनेक व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. देबिना बॅनर्जीने तिची अवघ्या१४ महिन्यांची मुलगी लियाना चौधरी हिला नुकतीच शाळेत पाठवण्यास सुरुवात केली आहे. तिची ही गोष्ट नेटकऱ्यांना पटली नाही. त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
देबिनाला लियाना आणि दिविशा या दोन मुली आहेत. अभिनेत्रीने तिची मोठी मुलगी लियाना चौधरीला वयाच्या अवघ्या 14 महिन्यांपासूनच प्लेस्कूलमध्ये पाठवण्यास सुरुवात केली आहे. यावरून तिच्यावर टीका करण्यास सुरुवात झाली. मात्र याला तिने सडेतोड उत्तर दिले आहे. देबिना बॅनर्जीने सांगितले की, ” मी लियानाला फक्त 15 मिनिटांसाठी शाळेत पाठवते. यामुळे ती काही काळ व्यस्त राहते आणि तिचा स्क्रीन टाईम देखील कमी झाला आहे. अन्यथा ती घरी राहून सतत टीव्ही पाहण्याचा आग्रह धरते. बाहेर पाठवल्यामुळे तिला आतापासून लोकांमध्ये मिसळायची सवय लागेल, हे देखील यामागचे एक उद्दिष्ट आहे.”
“जर मी काहीच मार्ग काढला नाही तर ते टीव्ही बघत राहतील. त्यामुळे मी तिला शाळेत पाठवत आहे. माझ्यासाठी ही अतिरिक्त जबाबदारीच आहे. सध्या पावसाळा सुरू झाला आहे, त्यामुळे मी ही जबाबदारी कशी पार पाडेन मलाच माहीत नाही. पण मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईन”, असेही ती म्हणाली. दरम्यान, देबिना लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर 3 एप्रिल 2022 रोजी आई झाली. पहिल्या बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या 7 महिन्यांत ती पुन्हा आई झाली होती. यावरूनही तिला खूप ट्रोल करण्यात आले होते. मात्र तेव्हाही तिने टीका करणाऱ्यांना चांगलेच सुनावले होते.