मुंबई – ज्या अपक्ष आमदारांची मते फुटली त्यांची नावे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जाहीर केली आहेत. त्यांची नावे जाहीर करताना राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचा उल्लेख स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार असा केला आहे. त्यावर स्वाभीमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी या संबंधात एक फेसबुक पोस्ट टाकली असून त्यात त्यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटले आहे की, संजयजी ज्या आमदाराचा उल्लेख तुम्ही स्वाभीमानीचा आमदार म्हणून करीत आहात, त्याला लाथ घालून आम्ही पूर्वीच त्याची हकालपट्टी केली आहे.
तेव्हा कृपा करून त्याचा उल्लेख स्वाभिमानीचा आमदार असा करू नका. आणि तो असा का वागला या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अजित पवार आणि जयंत पाटील हेच देतील, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.