वैद्यकीय आयोगाच्या विरोधात आज डॉक्‍टरांचा संप

नवी दिल्ली- भारतीय वैद्यकीय संघटना (इंडियन मेडिकल कौन्सिल) च्या जागेवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (नॅशनल मेडिकल कमिशन) लागू करण्याच्या विधेयकाला लोकसभेची मान्यता मिळाल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यकीय संघटनेने उद्या (बुधवारी) अत्यावश्‍यक सेवा वगळून 24 तासांच्या देशव्यापी संपाचा इशारा दिला आहे. लोकसभेमध्ये मंजूर झालेले विधेयक गरीब, विद्यार्थी आणि लोकशाहीच्या विरोधात असल्याची टीका संघटनेने केली आहे. आपत्कालिन, अपघात, अतिदक्षता आणि अन्य संबंधित सेवा या काळात सुरूच राहतील.

डॉक्‍टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांची देशपातळीवरील सर्वात मोठी संघटना असलेल्या भारतीय वैद्यकीय संघटनेच्या (आयएमए) तीन लाख सदस्यांनी या विधेयकाच्या विरोधात निदर्शने आणि उपोषणही करण्याचा इशारा दिला आहे. “आयएमए’शी बांधिलकी दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर्गांवर बहिष्कार घालण्याचे आवाहनही “आयएमए’ने केले आहे. दरम्यान निवासी डॉक्‍टरांची संघटना असलेल्या “फोर्डा’ आणि “एम्स’मधील निवासी डॉक्‍टरांच्या संघटनेने काळ्या फिती लावून काम करण्याचे ठरवले आहे.

सर्व प्रकारच्या वैद्यकीय शिक्षण, व्यवसाय आणि संस्थांचा विकास आणि नियमनासाठी “आयएमसी’च्या जागेवर राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापन करण्याच्या विधेयकाची शिफारस संसदेच्या स्थायी समितीने केली होती. त्यानुसार हे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले. मात्र त्याला “आयएमए’कडून यापुढेही विरोध केला जाईल, असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतनू सेन यांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)