गावसकर यांची टीका अयोग्य – मांजरेकर

नवी दिल्ली – राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीवर ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी केलेली टीका अयोग्य आहे. ही समिती अत्यंत प्रामाणिकपणे देशनिष्ठा जपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याबाबत आक्षेप घेणे चुकीचे आहे असे माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांनी सांगितले.

भारतीय संघाचे कर्णधारपदी विराट कोहली याची कशी निवड केली असे गावसकर यांनी आपल्या स्तंभात लिहिने होते. त्याबाबत मांजरेकर यांनी आपल्या स्तंभात म्हटले आहे की, जरी भारतीय संघास विश्‍वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी साखळी सामन्यांमध्ये या संघाने पाकिस्तान व ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांवर विजय मिळविला होता.

इंग्लंडविरूद्ध जरी भारताने साखळी सामना गमावला होता तरी अन्य लढतींमध्ये त्यांची कामगिरी अव्वन दर्जाचीच झाली आहे. या संघाचे नेतृत्व कोहलीने चांगल्या रीतीने केले आहे. त्यामुळेच त्याची पुन्हा कर्णधारपदी निवड होणे अपेक्षितच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)