मेलबोर्न, सिडनी – ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा न खेळताच सर्बियाचा जागतिक अग्रमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच याची ऑस्ट्रेलियातून रवानगी करण्यात आली. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने त्याचा व्हिसा दोनवेळा रद्द केला.
त्याच्या व्हिासाबाबत फेडरल न्यायालयात सुरू असणाऱ्या सुनावणीत रविवारी सकाळी तीन न्यायाधिशांच्या खंडपीठाने त्याचे अपील एकमुखी निर्णयाने फेटाळले. जोकोविचने इमिग्रेशन मंत्र्यांच्या व्हिसा रद्द केला. मात्र त्यांनी त्याचे कारण दिले या मुद्द्यावर त्याला करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते.
मेलबर्न विमानतळावर त्याला व्हिसाबातच्या कागदपत्रांतील चुकीमुळे रोखले होते तसेच त्याचा व्हिसा रद्द करुन त्याची रवानगी अवैधरीत्या देशात घुसखोरी केलेल्यांच्या छावणीत ठेवले गेले होते. त्याने याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता व त्यात विजयही मिळाला होता. मात्र, देशभावना लक्षात घेता सरकारने त्याचा व्हिसा पुन्हा एकदा रद्द करत त्याला मोठा धक्का दिला. आता त्याच्यावर निर्बंधही लावले गेले.
न्यायालयाने त्याची फेरविचार याचिका फेटाळून लावली असल्याने त्याला यंदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे त्याला आता ऑस्ट्रेलियातून परतावे लागणार आहे. सोमवारपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. त्यातच विक्रमी 21 वे ग्रॅंडस्लॅम विजेतेपद मिळवण्याचे त्याचे स्वप्न अपुर्ण राहणार आहे. त्याने अद्याप करोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. त्यामुळे त्याला मेलबर्न येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
तीन वर्षांसाठी देशबंदी
ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाच्या निर्णयानुळे जोकोविचवर ऑस्ट्रेलियामध्ये प्रवेशासाठी तीन वर्षांसाठी बंदी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन नियमांनुसार देश सोडण्याचा आदेश दिल्यानंतर त्या व्यक्तीला पुढील तीन वर्षे ऑस्ट्रेलियात प्रवेश करता येत नाही.