केवळ आठ दिवसात घटस्फोट

पुणे: दीड वर्षांपासून विभक्त राहणाऱ्या आय.टी. क्षेत्रातील उच्चशिक्षित पती-पत्नीला कौटुंबिक न्यायालयाने केवळ आठ दिवसात परस्पर संमतीने घटस्फोट मंजुर केला आहे. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी याबाबत आदेश दिला आहे. 6 जानेवारी रोजी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने 14 जानेवारी रोजी मंजुर केला.

माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांनी ऍड. विक्रांत शिंदे, ऍड. मंगेश कदम, ऍड. निखिल डोंबे आणि ऍड. सौदामिनी जोशी यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला होता. माधव आणि माधवी यांचा विवाह डिसेंबर 2015 मध्ये पुण्यात झाला. त्यांना कोणतेही आपत्य नाही. दोघांचे पटत नव्हते. शारीरिकरित्या दोघे दूर राहिले होते. इतक्‍या दिवसापासून वेगळे राहणाऱ्या दोघांनी परस्पर समंतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघांमध्ये अटी, शर्ती पुर्तता झाली असल्यामुळे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अमरदीप कौर वि. हरदीप कौर या न्यायनिवाड्याला अनुसरून हा निकाल असल्याचे ऍड. विक्रांत शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.