दिवे घाट समस्यांच्या विळख्यात

दिवे – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरिल व पुरंदर हवेलीला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे दिवे घाट. या घाटात मात्र, सध्या समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. रखडलेले रूंदिकरणाचे काम आणि घाटात जागोजागी प्रचंड प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे.

साइडपट्ट्यांच्या बाजूला गटारात जागोजागी कोसळलेल्या दरडी. तसेच बऱ्याच ठिकाणी घाटमाथ्यावर पावसाचे पाणी मुरल्याने दरडी कोसळण्याचा धोका आहे. घाटात रात्रीच्या वेळी अज्ञात वाहनातून राडारोडा टाकला जातो त्याची प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या पावसाचे प्रमाण चांगले असल्याने घाटपरिसर हिरवाईने नटला आहे. घाटात असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर उभारण्यात आलेली श्री विठ्ठलांची भव्य मूर्ती त्यामुळे घाटाच्या सौंदर्यात अजून भर पडली आहे, त्यामुळे घाटात पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. बेशिस्तपणे वाहन पार्क करून पर्यटक घाटातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत; परंतु यामुळे मोठ्या अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.