वाल्हे: जगभरामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढतच चाललेली असल्याने, अनेक स्तरांतून, कोरोना ग्रस्तांसाठी मदतीसाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढे येऊन जमेल तशी मदत करत असतांनाच, वाल्हे (ता.पुरंदर) येथील उद्योजक प्रमोद शहा, उमेश शहा कुटुंबीयांच्या वतीने पुरंदर तालुक्यातील दीडशेहून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
भटक्या समाजातील कुटुंबांना तहसीलदार रूपाली सरनोबत व पुणे जिल्हा बॅकेच माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे समृद्धी शहा, प्रणव शहा यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी सरपंच अमोल खवले, प्रमोद शहा, शरिष शहा उपस्थित होते.