वडगाव मावळ– राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. या नियुक्त्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी आणि सामाजिक, राजकिय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कार्याची दखल घेत पुणे जिल्हा सरचिटणीस पदी रमेश घोजगे, मावळ विधानसभा मतदार संघ सहकार सेल अध्यक्षपदी सुधाकर मारुती वाघमारे, मावळ तालुका महिलाध्यक्षपदी जयश्री पवार, मावळ तालुका आध्यात्मिक व वारकरी आघाडी अध्यक्षपदी योगेश पांडुरंग चोपडे, मावळ तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्षपदी अक्षय नारायण मुऱ्हे मावळ तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी नवनाथ ज्ञानेश्वर केदारी, उपाध्यक्षपदी सोपान नथू गोंटे यांना नियुक्ती पत्र खासदार अमोल कोल्हे, पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, मावळ तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, ओबीसी विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत, मावळ तालुका युवक अध्यक्ष विशाल वहिले यांच्या शुभहस्ते देण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा महिला अध्यक्ष भारती शेवाळे, पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोदसिंह गोतारणे, मावळ तालुका युवक उपाध्यक्ष आदिनाथ मालपोटे, सुधाकर वाघमारे, शंकर मोढवे, योगेश करवंदे, पंकज भामरे, जितेंद्र कालेकर, नरेंद्र मुऱ्हे, सिद्धेश मुऱ्हे, आकाश जगदाळे, प्रतीक मुऱ्हे, आकाश साळुंखे उपस्थित होते.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विचार व कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे काम माजी मंत्री मदन बाफना यांच्या मार्गदर्शनाखाली जोमाने करण्याचा मनोदय सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी व्यक्त केला.