नगर -जिल्हा परिषदेतर्फे देण्यात येणारे जिल्हा शिक्षक पुरस्कारांचे वितरण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ उद्या (शनिवारी) दुपारी 3 वाजता नगर-कल्याण रोड येथील द्वारका लॉन्स येथे होणार आहे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे,
खासदार डॉ. सुजय विखे, महापौर रोहिणी शेंडगे, आमदार डॉ. सुधीर तांबे, किशोर दराडे, आ. राम शिंदे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. बबनराव पाचपुते, आ. मोनिका राजळे, आ. शंकरराव गडाख, आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सीईओ आशिष येरेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
मागील दोन वर्षांपासून पुरस्कार वितरण झाले नव्हते. त्यामुळे यंदा चालू वर्षासह मागील दोन, असे एकूण 3 वर्षांतील शिक्षक पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी केले आहे.