मुंबई – करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन कंपनीने आपल्या नवीन ऍक्शन फिल्म फ्रॅन्चायजीची घोषणा केली आहे. या सिनेमाचे नाव “योद्धा’ आहे. आणि त्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा लीड रोलमध्ये असणार आहे. तर अभिनेत्री राशी खन्ना या ऍक्शनपॅक्ड सिनेमात लीड रोल साकारणार आहेत.
अभिनेत्री राशी खन्नाने दक्षिणेतील सुपरस्टार नागा चैतन्यसोबत मॉस्कोमध्ये थँक यू या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण केल्यावर आता योद्धा चित्रपटाच्या चित्रिकरणात भाग घेतला आहे. चित्रपटाचे शूटिंग लोणावळा आणि मुंबई येथे करण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पाटनीही मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
योद्धा हा चित्रपट भारताकडून पाकिस्तान विरोधात करण्यात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या कारवाईवर आधारित असणार आहे. अभिनेता सिद्धार्थ यात रॉ एजंटच्या स्वरुपात दिसून येऊ शकतो. धर्मा प्रॉडक्शन्सकडून निर्मित होणाऱया या चित्रपटाचे दिग्दर्शन सागर आम्बे आणि पुष्कर ओझा करत आहेत. हा चित्रपट 11 नोव्हेंबर २०२२ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तिच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास रुद्र: द एज ऑफ डार्कनेस या चित्रपटात अजय देवगणसोबतही तीची केमेट्री दिसणार आहे