मुंबई – दिशा पटानी तिच्या स्टाईलने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या फोटोशूटमुळे देखील चर्चेत असते. नुकतीच दिशा एका व्यक्तीसोबत डिनर डेटवर गेली होती. दिशा या व्यक्तीला डेट करत असल्याच्या चर्चा देखील सध्या सुरु आहेत. विशेष म्हणजे डिनरनंतर दोघेही रेस्टोरंटमधून बाहेर येताना स्पॉट झाले.
दिशा तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य वेगळे ठेवणे पसंत करते. ती तिचा मित्र आणि चर्चित बॉयफ्रेंड अलेक्झांडर इलिकसोबत डिनर डेटवर गेली होती. यावेळी दोघांमध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. डिनरनंतर अलेक्झांडरने अभिनेत्रीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. यामध्ये दोघे वेगवेगळ्या पोजमध्ये एकत्र सेल्फी घेताना दिसत आहेत.
एवढंच नाही तर दिशा अलेक्झांडर इलिकसोबत रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना देखील दिसली. दोघांनीही डिनरचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नव्या व्यक्तीसोबतच्या डिनर डेटमुळे दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
याआधीही देखील हे दोघे अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आले आहेत. जरी दोघे एकमेकांना त्यांचे चांगले मित्र सांगतात. एका मुलाखतीत सिकंदरने सांगितले होते की दिशा त्याच्या फॅमिली मेंबर सारखी आहे. दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. अलेक्झांडर हा व्यवसायाने जिम ट्रेनर, अभिनेता आणि मॉडेल आहे.
View this post on Instagram
दिशाने अनेक सिनेमांमध्ये काम केलं असलं तरी ती अद्याप एका मोठ्या सुपरहिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दिशा सध्या ‘कांगुवा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती योद्धा आणि ‘कल्की 2898 एडी’ अशा बिग बजेट सिनेमांमध्ये दिसून येणार आहे.