मुंबई – मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरेने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे. प्रार्थना अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ती इनस्टाग्रामवर शेअर करते. अनेकदा तिला तिच्या फोटोमुळे ट्रोलही केले जाते. नुकतेच तिने तिचा एक बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये प्रार्थना व्हाइट शर्टमध्ये दिसत आहे. या फोटोंचा सुंदर व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले की, ‘शनिवारचा मूड…गोरी तेरी आँखें कहें, रात भर सोयी नहीं, चंदा देखे चुपके कहीं, और तारे जानते हैं सभी, के किसने दिल ले लिया, किसको दिल दे दिया, ये दिल का लगाना कोई जानता नहीं.’ तिचे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस पडत असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. अभिनेता श्रेयस तळपदेने देखील प्रार्थनाच्या व्हिडिओवर ‘सोई नहीं..?? आप तो फ्रेश लग रहे हो मॅडम’, अशी कमेंट केली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, प्रार्थनाने याआधी पवित्र रिश्ता आणि क्राईम पेट्रोलसारख्या नॅशनल टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय मितवा, कॉफी आणि बरंच काही, बॉडीगार्ड, मिस्टर ॲन्ड मिसेस सदाचारी, फुगे यासारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोईंग आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही तिची मालिका देखील चांगलीच चर्चेत राहिली होती. यात प्रार्थना आणि श्रेयश तळपदेच्या जोडीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.