मुंबई- करोनाचा कहर बऱ्यापैकी संपल्यामुळे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहेत. मात्र करोना अजूनही गेलेला नाही. करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ती केव्हा येणार, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अवघ्या काही दिवसांनी करोनाची चौथी लाट येणार असल्याचे म्हटले जात आहे. जून महिन्यात करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कानपूर आयआयटीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून 22 जूनच्या आसपास देशात चौथी लाट सुरू होण्याचा अंदाज आहे.
ओमायक्रॉनच्या एक्सइ या व्हेरियंटमुळे चौथ्या लाटेचा धोका वाढल्याचा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आला. ऑगस्टमध्ये करोनाची चौथी लाट आपल्या सर्वोच्च बिंदूवर असेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.