पुणे – सलामीवीर शुभमन गिलचे नाबाद अर्धशतक व डेव्हीड मिलर आणि राहुल तेवतिया यांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आयपीएल स्पर्धेतील लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 144 धावा केल्या.
Innings Break!
Disciplined bowling from #LSG restricts #GujaratTitans to a total of 144/4.
Scorecard – https://t.co/45Tbqyj6pV #LSGvGT #TATAIPL pic.twitter.com/Sbc5laaSnf
— IndianPremierLeague (@IPL) May 10, 2022
गुजरातचा कर्णधार हार्दीक पंड्याने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सलामीवीर वृद्धिमान साहा लवकर परतला. त्यानंतर मॅथ्यु वेडनेही निराशा केली. गिलने एक बाजू सावरत नेटाने फलंदाजी केली. कर्णधार पंड्याही फारकाळ टीकू शकला नाही. 3 फलंदाज बाद झाले तेव्हा गुरजातच्या 51 धावा फलकावर लागल्या होत्या.
गिल मात्र सहजसुंदर फटकेबाजी करत होता. त्याने याच थाटात अर्धशतकही पूर्ण केले. त्याने मिलरच्या साथित संघाचे शतक फलकावर लावले. मिलर स्थिरावलेला असताना 26 धावांवर बाद झाला. त्याने या खेळीत 24 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावले. तो बाद झाल्यावर भरात असलेल्या राहुल तेवतियाने 16 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 16 धावा करताना गिलसह संघाला समाधानकारक धावसंख्या उभारुन दिली.
गिलने नाबाद 63 धावांची खेळी करताना 49 चेंडूत 7 चौकार फटकावले. या जोडीने 24 चेंडूत 41 धावांची अखंडीत भागीदारी केली. लखनौकडून आवेश खानने 2 तर, जेसन होल्डर व मोहसीन खानने प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
गुजरात टायटन्स – 20 षटकांत 4 बाद 144 धावा. (डेव्हीड मिलर 26, शुभमन गिल नाबाद 63, राहुल तेवतिया नाबाद 22, आवेश खान 2-26, मोहसीन खान 1-18, जेसन होल्डर 1-41).