- बारा करोना रुग्णांचा मृत्यू
- 167 बाधित, 414 करोनामुक्त
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. आज 414 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. नवीन 167 रुग्णांची नोंद करण्यात आली. शहरातील एकूण रुग्णसंख्या 85 हजार 677 इतकी झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरातील 159 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील आठ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 8 व शहराबाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरात 2038 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 335 रुग्णांचाही समावेश आहे.
सोमवारी दिवसभरात शहरात 12 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.
शहरातील चिंचवड, भोसरी, रहाटणी येथील 8 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील येरवडा, वेल्हे, आंबेगाव, खेड येथील 4 रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 414 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 81,784 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2099 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 1131 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.