नवी दिल्ली – भारताची स्टार महिला जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर हीला आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग घेता यावा यासाठी खास सुट दिली जाणार आहे. याबात भारतीय जिम्नॅस्टिक्स संघटनेने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला विनंती केली आहे.
दुखापत व उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात लावण्यात आलेली बंदी यामुळे दीर्घ काळ ती खेळापासून तसेच प्रसिद्धीपासून ती दूर होती. चीनमध्ये होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दीपाला मिळण्याचे संकेतही आता मिळत आहेत.
स्पर्धेसाठीच्या पात्रता निकषांमध्ये बसत नसतानाही दीपाची आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दीपा हिने 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवले होते.
त्यानंतर दुखापती व बंदी यांमुळे दीपा टोकियो ऑलिम्पिकलाही मुकली होती. डोपिंग चाचणीत दोषी सापडल्यामुळे तिच्यावर 21 महिन्यांच्या बंदीची शिक्षा सुनावण्यात आली. या शिक्षेचा कालावधी यंदा 10 जुलैला संपला.