चिंबळी – सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे जेवणाचे हाल होत आहे. मात्र, या लोकांचे हाल होवू नये म्हणून अनेकदानशुर व स्वयंसेवी संस्थांसह प्रशासन पुढे आले आहे. तर आनंद मेडीकल फाउंडेशन संचालित आनंद मेडीकल नर्सिंग इन्ट्युट हॉस्पिटलच्या वतीने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आजपर्यंत दररोज 1500 ते 2000 लोकांना वस्तीवर जाऊन दुपारचे जेवण व पिण्याच्या पाण्याची सोय करीत आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनिल काळे यांनी सांगितले.
दरम्यान, या यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची जबाबदारी डॉ. गजानन मंकीकर यांनी घेतली आहे. तर यासाठी आनंद इस्टिट्युटमधील सर्व कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स, नर्सेस, अधिकारी तसेच मुकेश उमाप मेडिकलसह मेडिकलमधील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. तसेच हे काम करीत असताना सोशल डिस्टसिंगसह शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन केले जात असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.