शेवगाव – भाजपा-शिवसेना, रिपाई (आठवले गट) रासप, शिवसंग्राम महायुतीच्या उमेदवार मोनिकाताई राजळे यांच्या प्रचारार्थ माजी खासदार दिलीप गांधी यांनी आज दिवसभर शेवगाव शहरासह तालुक्याच्या पूर्व भागातील गावात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला.
जि. प. सदस्य राहुल राजळे, चारुदत्त वाघ, बापूसाहेब पाटेकर, राधेश्याम तिवारी, बाळासाहेब सोनवणे, नगरसेवक कमलेश गांधी, जगदीश धूत, बंडू मेहेर, रवी सुरवसे, रिंकू बंब, सोनवणे, महादेव पवार, सुभाष बडधे, अशोक बडे, बाळासाहेब कोळगे, भिमराज सागडे, हरिभाऊ शिंदे, सखाहरी भूजबळ आदी कार्यकर्ते प्रचारफेरीमध्ये सहभागी झाले होते.
खा. गांधी यांनी आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान आखेगाव रस्त्यावरील स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून फेरीला सुरुवात केली. बाजार पेठेतील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या व्यावसायिकांना अभिवादन केले. त्यानंतर पूर्व भागातील चापडगाव, बालमटाकळी, कांबी, हातगावामध्ये त्यांनी प्रचारफेरी द्वारे मतदारांशी संवाद साधला.