पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने आपल्या 87 वा व्यवसाय आरंभदिवस, अनेक नव्या डिजिटल योजना आणि सेवा यांचा प्रारंभ करुन साजरा केला. या कार्यक्रमात बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव, कार्यकारी संचालक ए. बी. विजयकुमार, आशीष पाण्डेय यांच्यासह नियोजन विभागाचे महाव्यवस्थापक व्ही. एन कांबळे, नियोजन विभागाचे उपमहाव्यवस्थापक डॉ. प्रदीप मिश्रा, सहा. महाव्यवस्थापक डॉ. राजेंद्र श्रीवास्तव, उपस्थित होते.
ए. एस. राजीव यांनी बॅंक आर्थिक वर्ष 22 च्या तिसऱ्या तिमाहीतील निकालानंतर मध्यम आकाराची बॅंक झाल्याबद्दल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या बाहेर बॅंकेने 40% व्यवसायवृध्दी केल्याचे त्यानी सांगितले. बॅंकेने आपली डिजिटल वितरण यंत्रणा बळकट करण्यासाठी अनेक डिजिटल उत्पादने लॉंच केली, ज्यात ऑनलाईन लॉकर ऍप्लिकेशन, इन्शुरन्स क्लेम सेटलमेंट पोर्टल, BOMY चॅटबॉट सुविधा यांचा समावेश आहे.
बहुभाषिक मोडमध्ये व्हॉट्स ऍप बॅंकिंग, गोल्ड लोन ग्राहकांचे डिजिटल ऑन-बोर्डिग, फार्म हाऊसच्या बांधकामासाठी कर्जाचे डिजिटल ऑन-बोर्डिंग, कृषी फार्म यांत्रिकीकरणासाठी कर्जाचे डिजिटल ऑन-बोर्डिंग, 100 कोटी रुपयांपर्यंतचे पूर्व मंजूर कर्ज खेळते भांडवल मंजूर करताना कंत्राटदार आणि ईपीसी संपर्ककर्ते, कृषी / अन्न प्रक्रिया युनिट्स आणि कृषीसाठी 100 कोटी रुपयांपर्यंत कर्ज सुविधेसह महा कृषी समृद्धी योजना, क्लस्टर पध्दती अंतर्गत इन्फ्रा प्रकल्प, ऑनलाइन म्युच्युअल फंड यांचा समावेश आहे.