डिजिटल मार्केटिंग हा शब्द गेल्या काही वर्षांत फार प्रचलित झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे. डिजिटल मार्केटिंग हे आधुनिक काळाची गरज बनले आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये मार्केटिंगसाठी हे प्रमुख माध्यम असणार आहे.
प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग स्वीकारणे व त्यासाठी कुशल लोकांची नेमणूक करणे गरजेचे बनले आहे. याचा फायदा तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा आर ओ आय वाढवण्यासाठी नक्कीच होईल. करोनाच्या संकटकाळामध्ये तर डिजिटल मार्केटिंगची मागणी अजूनच वाढली आणि त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. कारण सरकारने जी नियमावली सादर केली होती त्याची पूर्तता करून व्यवसाय चालविणे अशक्य होते आणि लॉकडाऊनमध्ये तर सर्वच व्यवसाय ठप्प पडले होते. पण ज्या व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायाचे डिजिटल मार्केटिंग केले होते त्यांचा व्यवसाय करोना संकटातही चालू होता आणि त्यांनी त्या काळातही भरपूर नफा कमावला. हे सर्व त्यांना फक्त आणि फक्त डिजिटल मार्केटिंगमुळे शक्य झाले.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?
डिजिटल मार्केटिंग हा मार्केटिंगचाच एक भाग आहे ज्यामध्ये उत्पादन आणि सेवा यांचे मार्केटिंग इंटरनेट आणि ऑनलाइन आधारित ज्या डिजिटल टेक्नॉलॉजी आहेत त्यांचा वापर करून केला जातो.
आता पाहूयात डिजिटल मार्केटिंग व्यवसायासाठी का गरजेचे आहे
(1) सर्व व्यावसायिकांना समान संधी
अगोदर जेव्हा डिजिटल मार्केटिंग प्रचलित नव्हते तेव्हा फक्त मोठ्या कंपन्या आणि मल्टीनॅशनल कंपन्या त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ऑनलाइन मार्केटिंगच्या मोहिमा (उरारिळसप) राबवत असत कारण त्यासाठी भरपूर निधी लागायचा आणि तो छोट्या व्यावसायिकांकडे उपलब्ध नसायचा.
आताच्या या डिजिटल मार्केटिंगच्या युगामध्ये सर्व काही शक्य आहे. आता छोट्या व्यावसायिकांनाही त्यांचा व्यवसाय मल्टिनॅशनलप्रमाणे वाढविण्याची संधी मिळत आहे. आणि तेही अगदी कमी गुंतवणुकीमध्ये तेही आता जगाच्या पाठीवर कुठूनही मोठ्या प्रमाणात ग्राहक आकर्षित करू शकतात. शिवाय हे करण्यासाठी त्यांना कोणत्याही ब्रॅंच ऑफिस आणि कॉल सेंटरची आवश्यकत नाही.
(2) पारंपरिक मार्केटिंगपेक्षा प्रभावी खर्च
डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा जास्त प्रभावीपणे तुमचे पैसे खर्च करतो. छोट्या व्यावसायिकांना याचा जास्त फायदा होतो कारण त्यांच्याकडे निधी आणि भांडवल हे फारच कमी असते आणि डिजिटल मार्केटिंग त्यांना कमी खर्चात जास्त चांगले परिणाम दर्शवते.
रीींपशी जी एक नामांकित डिजिटल मार्केटिंग कंपनी आहे त्यांच्या वार्षिक अहवालानुसार या वर्षी 28% व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायाचे पारंपरिक मार्केटिंग न करता डिजिटल मार्केटिंग करण्यास पसंती दिली. यामगाचे कारण म्हणजे डिजिटल मार्केटिंग कमी खर्चात जास्त प्रभावी परिणाम देते.
(3) व्यवसायाची प्रतिष्ठा आणि विश्वास वाढवता
लक्ष्यीत ग्राहकांना (ढरीसशींशव र्उीीींेशी) आपल्याकडे आकर्षित करण्याची ताकद डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे. एखाद्या ग्राहकाला आपले उत्पादन किंवा सेवा आवडली आणि त्याबद्दल त्यांना अधिक माहिती जाणून घ्यावयाची असेल तर तुम्ही त्यानुसार थेट त्या ग्राहकांशी संवाद साधू शकता. ग्राहकांनी आज्ञा दिलेले योग्य उत्पादन त्यांना योग्य ठिकाणी आणि दिलेल्या वेळेत पोहोचवणे हे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची प्रतिष्ठा आणि विश्वास वाढविण्यास मदत करते.
(4) जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते
उत्पादन आणि सेवेच्या मार्केटिंगची त्या व्यवसायाच्या ऑनलाइन व्यवसायाची प्रगती ही आलेल्या ग्राहकांच्या यादीपैकी किती टक्के ग्राहक हे नोंदणी करणे , खरेदी करणे किंवा सदस्यत्व घेणे यापैकी एकामध्ये रूपांतरित झाले यावर अवलंबून असते. ग्राहकांच्या रुपांतरणाशिवाय ग्राहकांच्या मोठ्या यादीला किंवा मार्केटिंगच्या अथक प्रयत्नांना शून्य किंमत आहे. म्हणूनच व्यावसायिकांचे लक्ष्य ग्राहक रूपांतरण हे असते.
(5) चांगला महसूल मिळवण्यास मदत होते
डिजिटल मार्केटिंगचे प्रभावी तंत्र तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक मिळवण्यास मदत करेल तसेच त्यामुळे तुम्हाला चांगल्या महसुलाच्या रूपात फायदेशीर नफा होईल. जे छोटे आणि मध्यम व्यावसायिक चांगल्या महसुलाच्या दृष्टिकोनाने डिजिटल मार्केटिंग तंत्र वापरतात त्यांना व्यवसाय वाढविण्याच्या अगणित संधी असतात आणि हेच तंत्र व्यवसायाची मालमत्ता वाढविण्यास उपयुक्त ठरते आणि यामुळेच कोणत्याही आर्थिक संकटात तुमचा व्यवसाय न डगमगता उभा राहू शकतो.
(6) लक्ष्यीत ग्राहकांशी संवादाची खात्री देते
डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा का सरस आहे याचे कारण म्हणजे त्यामध्ये लक्ष्यीत ग्राहकांशी प्रत्यक्ष वेळी संवाद साधता येण्याची क्षमता असते. ग्राहक कसा तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना कितपत तुमचे उत्पादन आवडले हा फक्त एक पैलू आहे. तुम्ही व्यावसायिक म्हणून किती चांगल्या प्रकारे तुमचे ग्राहक हाताळता आणि त्यांना संतुष्ट करता यावर तुमच्या व्यवसायाची प्रगती किंवा अधोगती अवलंबून असते. तुमच्या ग्राहकांशी चांगला संवाद हा ग्राहकांसाठी एक चांगला अनुभव असू शकतो. आणि याच गोष्टीची परस्परांतील नातेसंबंध, विश्वास आणि प्रामाणिकपणा वृद्धिंगत होण्यास मदत होते.
(7) व्यवसायाचे ऑनलाइन अस्तित्व अबाधित राहते
तुमच्या व्यवसायाचे स्वतंत्र संकेतस्थळ असणे हे तुमच्या व्यवसायाचे ऑनलाइन अस्तित्व आहे. तुमच्या संकेतस्थळावर ग्राहक नोंदणी करत असतील किंवा चौकशी करून एखाद्या उत्पादनाची खरेदी करत असतील तर हेच तुमच्या व्यवसायाचे ऑनलाइन अस्तित्व राखून ठेवण्यास मदत करतात. तुमचे दुकान हे काही कारणामुळे बंद राहू शकते पण ऑनलाइन दुकान हे 24 बाय 7 चालूच राहते. त्यामुळे तुम्हाला याचा नफा कमविण्यासाठी फायदा होऊ शकतो.
हे आणि असेच अगणित फायदे तुम्हाला तुमच्या व्यवसायात डिजिटल मार्केटिंग मुळे मिळू शकतात. त्यामुळे ज्या व्यावसायिकांनी डिजिटल मार्केटिंग तंत्र आत्मसात केलेयं त्यांना त्यांच्या प्रखर यशासाठी भरपूर शुभेच्छा आणि ज्यांनी केले नाही त्यांनी आपल्या व्यवसायाच्या प्रगतीला चांगली चालना मिळण्यासाठी नक्की हे तंत्र अवगत करा ही सदिच्छा.