#Video : धोनीची लाडकी झिवा ‘सुरेश रैना’ आणि ‘ड्वेन ब्रावो’सोबत करतेय मस्ती

एम.एस.धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलमध्ये झालेल्या सातव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 5 विकेटसनी पराभव केला. हा सामना रविवारी ईडन गार्डनवर पार पडला.

त्यानंतर महेंद्र सिंग धोनी आपल्या लाडक्या मुलीला म्हणजेच झिवाला मैदानात आणले व तिच्यासोबत विजयाचे सेलिब्रेशन केले. तसेच झिवाने ड्वेन ब्रावो, सुरेश रैना यांच्यासोबतही मस्ती केली आणि याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल माध्यमावर चांगलेच व्हायरल झाले.

 

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची मुलगी झिवा यांचे व्हिडियो कायम चर्चेचा विषय ठरतात. झिवाचे गोड फोटो आणि व्हिडीओ धोनी सोशल मीडियावर पोस्ट करतो न करतो तोच ते व्हायरलही होतात.

चेन्नई सुपर किंग्सने सुध्दा आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर झिवाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये झिवा धोनीचा हात पकडून मैदानावर दिसत आहे. पहिल्यांदा ती इमरान ताहीरशी काही गप्पा मारते. त्यानंतर ड्वेन ब्रावो याला टोपी घालणे शिकवत आहे. हा झिवाचा क्युट व्हिडीओलाही सोशल माध्यवावर चांगली पंसती मिळत आहे.

सामन्यानंतर संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या सुरेश रैनाला किस करताना देखील झिवा दिसत आहे. हा फोटो देखील सोशल माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.

तसेच आणखी एक व्हिडीओ चेन्नई सुपर किंग्सने शेअर केला आहे, यामध्ये झिवा चेन्नईच्या विजयानंतर नाचताना दिसत आहे.

धोनी आणि झिवाचा व्हायरल झालेले हे काही पहिलेच छायाचित्र नाही. हल्लीच धोनी झिवासोबत विविध भाषांमध्ये बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायर झाला होता. धोनीचे त्याची कन्या झिवा सोबतचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर नेहमीच धुमाकूळ घालत असतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.