रांची – झारखंडमध्ये मंगळवारी एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली. त्या दुर्घटनेत 14 जण मृत्युमुखी पडले. तर, 18 जणांना गंभीर भाजल्याने उपचारासाठी नजीकच्या रूग्णालयांत दाखल करण्यात आले. झारखंडच्या धनबादमधील आशीर्वाद टॉवर या इमारतीला सायंकाळच्या सुमारास आगीने घेरले. त्याविषयीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने दुर्घटनास्थळी रवाना करण्यात आले.
अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मदत आणि बचाव कार्यात पोलिसांबरोबरच स्थानिकही सहभागी झाले. मृतांमध्ये काही महिला आणि बालकांचाही समावेश आहे. आगीने घेरलेल्या इमारतीत सुमारे 70 फ्लॅट असल्याचे समजते. त्यापैकी एका फ्लॅटमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे लागलेल्या आगीने काही क्षणांतच इतर मजल्यांनाही घेरले.
धनबाद के आशीर्वाद टावर अपार्टमेंट में आग लगने से लोगों की मृत्यु अत्यंत मर्माहत करने वाली है। जिला प्रशासन द्वारा युद्ध स्तर पर कार्य किया जा रहा है तथा हादसे में घायल लोगों को उपचार उपलब्ध कराया जा रहा है। मैं खुद पूरे मामले को देख रहा हूँ।
— Hemant Soren (@HemantSorenJMM) January 31, 2023