Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील परळी येथे आज शासन आपल्या दारी ( Shasan Aplya Dari ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्याकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी बीडच्या एमआयडीसीमध्ये कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.
आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच भाजप नेत्या पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकाच मंचावर असल्याचं पाहायला मिळालं. हे चित्र पाहून बीडमधील प्रत्येक ग्रामस्थ सुखावला आहे. यावेळी दोन्ही भावाबहिणींनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळली.
मात्र, या कार्यक्रमातील उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या एका वाक्यामुळे राजकीय वर्तुळात एक चर्चा रंगली असून, अनेक तर्कवितर्क देखील लावण्यात येत आहे. नेमकं अजित पवार ( Ajit Pawar ) आपल्या भाषणात काय बोलले हे आपण पाहूया….
धनंजय माझ्या अन फडणवीसांच्याही जवळचा…
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी भाषणात धनंजय मुंडे यांचं कौतुक केलं. ते म्हणाले, ही सगळी काम करत असताना धनंजय माझ्याही जवळच आहे. आणि देवेंद्रजींच्याही जवळचा आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील त्यांच्या कामासाठी धनंजयला भरभक्कम पाठिंबा देत असतात, असे विधान उपमुख्यमंत्री अजित यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या या विधानाची चर्चा रंगू लागली आहे.