नवी दिल्ली – बर्मिंगहॅममध्ये पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत सरस कामगिरी करण्याचा विश्वास व्यक्त करत असलेल्या भारतीय पथकाला धक्का बसला आहे. मैदानी स्पर्धेतील महिला धावपटू एस. धनलक्ष्मी व तिहेरी उडी प्रकारातील स्टार खेळाडू ऐश्वर्या बाबू या डोपिंग चाचणीत दोषी आढळल्या आहेत.
जागतिक ऍथलेटिक्सच्या अॅ थलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने (एआययू) घेतलेल्या डोपिंग चाचणीत धनलक्ष्मीने बंदी घालण्यात आलेले स्टेरॉईड्स घेतल्याचे समोर आले आहे. ती या स्पर्धेत शंभर मीटर आणि 4 बाय 100 मीटरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होती.
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीचे (नाडा) घेतलेल्या डोपिंग चाचणीत ऐश्वर्या बाबू देखील दोषी असल्याचे समोर आले आहे. तिनेही बंदी घातलेले औषध घेतल्याचे सांगितले जात आहे.
या स्पर्धेत ऐश्वर्या तिहेरी उडी प्रकारात सहभागी होणार होती. तिने चेन्नईत नुकत्याच पार पडलेल्या स्पर्धेत 6.73 मीटर लांब उडी मारत राष्ट्रीय विक्रम साकार केला होता.