नवी दिल्ली – राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर होणार आहे. त्या निवडणुकीसाठी 18 जुलैला 99 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. आता गुरुवारी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला प्रारंभ होईल.
त्यानंतर सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होणे अपेक्षित आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलैला समाप्त होणार आहे. त्यांचे उत्तराधिकारी ठरणाऱ्या 15 व्या राष्ट्रपतींचा शपथविधी 25 जुलैला होईल.
सोनिया गांधी यांची गुरुवारी ईडी चौकशी
राष्ट्रपती निवडणुकीत सत्तारूढ एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना, तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली. बाजूने असणारे मतमूल्य विचारात घेता मुर्मू यांचे पारडे जड असल्याचे याआधीच समोर आले. त्यामुळे त्यांच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकताच बाकी असल्याचे मानले जात आहे.