बर्मिंगहॅम – भारताचा मराठमोळा स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत “रूपेरी’ इतिहास रचला आहे. साबळेने राष्ट्रकुल स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये भारताला प्रथमच पदक मिळवून दिले आहे.
साबळेने पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत 8:11:20 अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले. मागील सहा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिन्ही पदके ही केवळ केनियन खेळाडू जिंकत होते. 24 वर्षात प्रथमच केनियाशिवाय अन्य देशाने स्टीपलचेसमध्ये पदक जिंकले. अविनाशने हे रौप्य पदक जिंकत त्यांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे.
𝘼 𝙧𝙚𝙘𝙤𝙧𝙙-𝙗𝙧𝙚𝙖𝙠𝙞𝙣𝙜 𝙨𝙞𝙡𝙫𝙚𝙧 𝙞𝙣 𝙨𝙩𝙚𝙚𝙥𝙡𝙚𝙘𝙝𝙖𝙨𝙚! 🇮🇳
Win 🥈 👉 ✅
Break national record 👉 ✅
Set personal best 👉 ✅#TeamIndia‘s @avinash3000m does it all in the men’s 3000m steeplechase at @birminghamcg22 🎇🔥#B2022 | 📸 @thecgf pic.twitter.com/PWC9WQNbvd
— Team India (@WeAreTeamIndia) August 6, 2022
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावातील साबळेने जागतिक चॅम्पियनशिपमधील निराशाजनक कामगिरीत सुधारणा केली. 27 वर्षीय अविनाश साबळेने 8:11.20 सेकंदांची वेळ नोंदवत त्याच्या आधीच्या राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. काहीशा फरकाने तो सुवर्णपदकापासून वंचित राहिला. केनियाच्या अब्राहमने 8.11.15 मिनिटं इतकी वेळ घेत सुवर्णपदक जिंकले. तर कांस्यपदकही केनियाच्या आमोस सेरेमनेने 8.16.83 मिनिटांचा वेळ घेत जिंकले.
सियाचीन येथे लष्करात सेवा बजावलेल्या साबळे अलीकडच्या काळात अनेक राष्ट्रीय विक्रम मोडीत काढले आहेत. गेल्या महिन्यात राबात येथे प्रतिष्ठित डायमंड लीगमध्ये पाचव्या स्थानावर असताना त्याने 8:12.48ची वेळ नोंदवली होती.