पिंपरी – ऑगस्ट महिन्याच्या पहिला रविवार हा मैत्री दिन अर्थातच फ्रेंडशीप डे साजरा केला जातो. त्यानिमित्त बाजारात विविध प्रकारचे फ्रेंडशीप बॅंड विक्रीसाठी आले असून मैत्रीचा धागा पक्का करणाऱ्या या बॅंडना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मोठी मागणी आहे.
ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा मैत्री दिन साजरा केला जातो. या दिवशी मित्र- मैत्रिणी एकमेकांच्या हातात मैत्रिचा धागा बांधतात आणि आपली मैत्री अधिक घट्ट करतात. त्यानिमित्त संदेश पत्र आणि जोडीला मैत्रीच्या बंधाला.
घट्ट धाग्यात बांधणाऱ्या भेटवस्तू विक्रीसाठी आल्या आहेत. तसेच हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील संदेशपत्रांनाही मागणी आहे. पिंपरी चिंचवड शहरासह उपनगरांमधील दुकानांमध्ये शुभेच्छापत्रांसह विविध प्रकारचे फ्रेंडशीप बॅंड खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.
पिंपरी कॅंम्पात मोठ्या प्रमाणात संदेशपत्र आणि फ्रेंडशीप बॅंड विक्रीसाठी आलेले आहेत. सध्या शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. फ्रेंडशीप डे हा रविवारी असतो.
शाळा, महाविद्यालयांना या दिवशी सुटी असते. त्यामुळे सुटीच्या दिवशी खास फ्रेंडशीप डे साजरा करण्यासाठी ही मुले भेटतात. एकमेकांच्या हातात हा मैत्रिचा धागा बांधतात. त्यासाठी विविध रंगातील, आकारातील आणि मैत्रीपूर्ण आशय असलेले बॅंड खरेदी केले जात आहेत. तसेच या दिवसासाठी खास नियोजन केले जात आहे.