नवी दिल्ली – देशात आज फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिन साजरा करण्यात येत आहे. मित्र आपल्या जीवलग मित्रांना शुभेच्छा देत आहेत. राजकारणात देखील हा डे साजरा करण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रेंडशिप डे निमित्त शुभेच्छा देत त्यांच्यावर निशाणाही साधला.
इंस्ट्राग्रामवर पोस्ट शेअर करून “हम दो, हमारे दो की सरकार” असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना मैत्री दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी खास Video शेअर केला आहे.
View this post on Instagram
राहुल गांधी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती गौतम अदानी, मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यासोबत दिसत आहेत. राहुल यांनी व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही तासातच हजारो लोकांनी तो लाईक केला आहे.