नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या पाच राज्यांत नोव्हेंबरमध्ये मतदान पार पडेल. तर सर्व राज्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. 7 आणि 17 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात छत्तीसगडची निवडणुक मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
दरम्यान, सर्व पक्षांनी कसून तयारी केली आहे. त्यातच आज भाजपने येथील पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी छत्तीसगडमधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातून भाजप नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्टार प्रचारकांमध्ये निवड केली आहे.
भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे प्रमुख जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि इतर महत्वाच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. याच यादीत 18व्या क्रमांकावर देवेद्र फडणवीस यांचे नाव आहे.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. राज्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. निवडणूक आयोगाने पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या पाच राज्यातील मतदान नोव्हेंबर महिन्यामध्ये पार पडेल. तर सर्व राज्यांचा निकाल 3 डिसेंबरला लागेल. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर मध्य प्रदेशमध्ये भाजप सत्तेत आहे. राजस्थानमध्येही काँग्रेसची सत्ता आहे, तर तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीचे सरकार आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे सरकार आहे.
BJP releases a list of 40 campaigners who will campaign for party candidates for phase 1 of the Chhattisgarh elections.
PM Narendra Modi, BJP chief JP Nadda, Defence Minister Rajnath Singh, HM Amit Shah and others to campaign. pic.twitter.com/7cUAM95oR7
— ANI (@ANI) October 19, 2023