मुंबई – संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजपा आमदार नितेश राणे यांना अटक वॉरंट निघाले आहे. तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि संतोष परब या शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केलेला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज आणि याप्रकरणी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना सिंधुदुर्गपोलिसांनी बजावलेली नोटीस यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे.
या प्रकरणावरून भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग पोलिसांनी नारायण राणे यांना नोटीस बजावल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसते!
CRPC 160 ची नोटीस देणारे पोलिस जाणीवपूर्वक हे विसरले की 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलिस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलविताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते.
(1/3)@MeNarayanRane #NarayanRane— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 30, 2021