Pune । नवले पुलाजवळ डंपरने ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ एका डंपरने ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. त्यामध्ये डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील ६ प्रवासी आणि डंपर चालक जखमी झाले आहेत.
हा अपघात आज सकाळी ६ वाजता झाला आहे.. मुंबईकडून सातारच्या दिशेने जाताना हा अपघात झाला असून डंपरने वडगाव पुलाजवळ असणाऱ्या व्ही आर एल ट्रॅव्हलच्या उभ्या असणाऱ्या ट्रॅव्हलला मागच्या बाजूने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.
जीवित हानी झाली नाही. सहा जखमी झाले असून त्यांना जवळील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी सिंहगड रस्ता वाहतूक पोलिस, सिंहगड रस्ता पोलिस दाखल झाले असून वाहने रस्त्याच्या मधून क्रेनच्या साह्याने बाजूला घेण्यात आली आहे. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलिस करत आहे.