बेरोजगारी कमी होऊनही ब्रिटनमधील दारिद्य्राचे प्रमाण वाढले

लंडन – ब्रिटनमधील बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊनही त्या देशातील दारिद्य्राचे प्रमाण वाढले आहे. ब्रिटन मधील सामाजिक बदलांच्या स्थितीची पहाणी करणाऱ्या एका संघटनेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ब्रिटन मध्ये बेरोजगारीचे प्रमाण सध्या कमी झाले आहे. तेथे सध्या बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 45 वर्षांतील सर्वात नीचांकी पातळीवर आहे. रोजगारीचे प्रमाण वाढत असले तरी लोकांना त्यांच्या कामाच्या तुलनेत पुरेसा पगार मिळत नसल्यानेच या देशातील दारिद्य्राचे प्रमाण वाढले आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षात मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या दारिद्य्राचे प्रमाण वाढले असल्याचे यात म्हटले आहे. ब्रिटन मध्ये दारिद्य्र रेषेखाली राहात असलेल्यांची संख्या आता 1 कोटी 40 लाख इतकी झाली आहे. अर्थात तेथे दारिद्य्राचा निकष हा युरोपिय जीवन शैली व राहणीमानाच्या अनुषंगाने लावला जातो. ब्रिटन मध्ये नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि ब्रेक्‍झिटचा निर्णय झाल्यानंतर आपल्याला देशाची आर्थिक प्रगती अधिक जोरकसपणे करावी लागेल अशी सुचनाही या अहवालात करण्यात आली आहे.

ब्रिटन मधील रोजगारीचा सध्या दर हा 76.3 टक्के इतका आहे. अलिकडच्या अनेक दशकातील हा सर्वात कमाल दर आहे असेही या अहवालात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here