पुणे – सध्या सर्वत्र ‘चंद्रमुखी’ या मराठी चित्रपटाचा बोलबाला आहे. या सौंदर्यवतीने सर्वांवर जादू केली असून, अनेक जण तिच्या प्रेमात पडले आहेत. अशातच बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री ‘प्रियांका चोप्रा’ हिने देखील ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचं तोंड भरून कौतुक केलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा प्रियांकाने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असून ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. प्रियांका ही सध्या पती निक जोनससोबत अमेरिकेत स्थायिक झाली आहे.
दरम्यान, शेअर केलेल्या पोस्ट मध्ये प्रियांका म्हणाली की, “तिने चंद्रमुखी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे. अभिनंदन आदिनाथ कोठारे. येत्या २९ एप्रिलला चंद्रमुखी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात’ असे तिने म्हटले आहे.
‘पानिपत’, ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक ‘विश्वास पाटील’ यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी केली आहे.
चंद्रमुखी या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत. चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे ध्येयधुरंदर राजकारण्याची भूमिका साकारणार असून, चंद्रमुखीची मुख्यभूमिका अभिनेत्री ‘अमृता खानविलकर’ साकारणार आहे. येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.