नगर – श्रीगोंदा तालुक्यातील (जुने चांभार गोदा) येथे (रविदास) महाराजांची समाधी आहे या समाधी शेजारी श्रीगोंदा नगरपालिकेकडून शौचालय उभारण्याचे काम चालू आहे हे काम त्वरित थांबून. निषेध व्यक्त करून राष्ट्रीय चर्मकार महासंघ नगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन करून नायब तहसीलदार आर.जी. दिवान यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव साळवे समवेत जिल्हा अध्यक्ष राजेंद्र बुंदेले, संतोष उदमले, कैलास गांगर्डे, शोभाताई कानडे, बाळासाहेब केदारे, संभाजी आहेर, सिंधुताई कटके, चींनुलाल बुंदेले, खेमराज बुंदेले, नलिनी गायकवाड, सुनिता बागडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
संत रोहिदास महाराजांची समाधी शेजारी श्रीगोंदा नगरपालिकेकडून शौचालय उभारणीचे काम चालू आहे त्याचा जाहीर निषेध करून श्रीगोंदा नगरपालिकेचे पदाधिकारी आणि काही स्वार्थी राजकारणी लोकांच्या संकुचित धोरणातून हे काम चालू केले आहे.