वॉशिंग्टन : मायकेल ब्लूमबर्ग यांना अब्जोपती बनवणारी वित्तीय माहिती पुरवणारी ब्लूमबर्ग एलपी ही कंपनी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यास विकून टाकेन, अशी घोषणा ब्लूमबर्ग यांनी केली. ते डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्क्ष पदाची निवडणुक लढवणार आहेत.
ब्लूमबर्ग यांच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी झाला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. निवडणुकीच्या रिंगणात आपली टोपी ब्लूमबर्ग यांनी फेकल्यानंतर नोव्हेंबरपासून त्यांची लोकप्रियता वाढत आहे. बुधवारी लासवेगासमध्ये ते पहिल्या विवादाला सामोरे जातील. राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची तीन नोव्हेंबरला लढत होईल. न्यूयॉर्कचे माजी महापौर असणाऱ्या ब्लूमबर्ग यांनी निवडून आल्यास ब्लूमबर्ग एलपी ही कंपनी विकतील, असे त्यांच्या प्रवक्त्याने आज सांगितले.
बातम्यांशिवाय वॉल स्ट्रिटमधील संस्थांना वित्तीय माहिती देण्याचा व्यवसाय ब्लूमबर्ग एलपी करत आहे. त्यांनी 1981मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीची बहुतांश मालकी ब्लूमबर्ग यांच्याकडे आहे. त्याची बर्टन टेलर या बहुराष्ट्रीय कंपनीने त्याची प्रस्तावित मुल्यांकन 2019 मध्ये 10 अब्ज डॉलर ठरवले आहे. ब्लूमबर्गची प्ररिस्पर्धी कंपनी रॉयटर्स न्यूज आहे.
एक विश्वस्त संस्था स्थापन करून त्यानंतर तिची विक्री करण्यात येईल असे ब्लूमबर्ग यांच्या प्रचारात म्हटले आहे. डेमोक्रेटीक पक्षाचा ऊमेदवार ठरवताना सुरवातीला ही ब्लूमबर्ग यांना पुरेसा पाठींबा मिळत नव्हता. त्यांना मार्च तीनला होणाऱ्या 14 राज्यांत पाठींबा मिळेल असे मानण्यात येत आहे.