Lok Sabha Election 2024 |देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची तसेच जनतेची प्रतीक्षा संपली आहे. गेल्यावेळेप्रमाणेच यंदाही सात टप्प्यात निवडणुका होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला, तर सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान १ जूनला होणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.
केरळमध्ये दुसऱ्या टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहे येथे 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये १९ एप्रिलला मतदान होणार आहे.
आता आययूएमएलसह इतर काही मुस्लिम संघटनांनी या प्रकरणी आक्षेप व्यक्त केला आहे. 19 एप्रिल आणि 26 एप्रिल दोन्ही शुक्रवार पडत आहेत. हा दिवस प्रत्येक मुस्लिमांसाठी महत्त्वाचा आहे. या दिवशी सर्वजण नमाज अदा करतात. अशात शुक्रवारी होणाऱ्या निवडणुकांमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळेच मुस्लिम संघटना निवडणुकीची तारीख बदलण्याची मागणी करत आहेत.
Lok Sabha Election 2024 | ‘शुक्रवारी निवडणूक झाल्यास जनतेला अडचणी येतील’
इंडियन युनियन मुस्लिम लीगचे (IUML) म्हणणे आहे की त्यांना निवडणुकीची तारीख बदलून इतर तारखेत आणायची आहे. यासाठी ते भारतीय निवडणूक आयोगाशी (ECI) संपर्क साधतील. IUML च्या मते, शुक्रवारी निवडणुका घेतल्याने मतदार, अधिकारी आणि उमेदवारांची खूप गैरसोय होते कारण शुक्रवार हा मुस्लिमांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे.
Lok Sabha Election 2024 | तारीख बदलण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जाणार आहे
आययूएमएलचे राज्य सरचिटणीस पीएम ए सलाम म्हणतात की शुक्रवारी लोक नमाज अदा करण्यासाठी मशिदींमध्ये जमतात. अशा स्थितीत शुक्रवारी होणाऱ्या मतदानामुळे मतदार, उमेदवार, पोलिंग एजंट आणि निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या अधिकाऱ्यांची गैरसोय होणार आहे. राज्य सरचिटणीस म्हणाले की IUML तारीख बदलण्याची मागणी करण्यासाठी ECI कडे जाईल. IUML व्यतिरिक्त, इतर संघटना देखील तारीख बदलण्याची मागणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे जाण्याचा विचार करत आहेत.
26 एप्रिलला एकाच दिवशी केरळमध्ये 20 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी 18 जागा सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत तर 2 जागा राखीव आहेत. तामिळनाडूमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. येथील 39 जागांवर एकाच दिवशी मतदान होणार आहे. तामिळनाडूमध्ये 39 जागांपैकी 7 राखीव जागा आहेत.