वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली तालुका हवेली या गावात हडपसर ग्रामीण उपविभाग अंतर्गत महावितरणची वाघोली शाखा कार्यरत आहे. सदर शाखेमध्ये 71000 महावितरणचे ग्राहक आहे. वाघोली चे क्षेत्र हे चाळीस किलोमीटरपेक्षा वरती आहे, त्यामध्ये 27 उच्च दाब वीज वाहिन्या कार्यरत आहे व वीज वाहिन्यांची सगळी मिळून एकूण लांबी कमीत कमी साडेतीनशे किलोमीटर आहे.
तरी ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकामी सदर शाखेचे विभाजन करणे गरजेचे असून तात्काळ शाखेचे विभाजन करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब सातव पाटील (गवळी), माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील, रामभाऊ दाभाडे यांनी शिरूर हवेलीच्या आमदार अशोक पवार, मुख्य अभियंता पुणे परिमंडळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली मधून मासिक महावितरण उत्पन्न अंदाजे 9 कोटी रुपये येत असते. सध्या वाघोली शाखेमध्ये फक्त एक शाखा अभियंता व तेवीस कर्मचारी कार्यरत आहे. लवकरात लवकर महावितरणच्या शाखेचे विभाजन करण्याची मागणी सातव यांनी केली आहे.