लखनऊ – आगरा-लखनऊ एक्सप्रेसवेवर शनिवारी रात्री एक्सल तुटल्याने बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. फरुखाबादहून जयपूरकडे जात असताना डौकी भागात हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक, वाहक यांसह बसमध्ये एकूण 85 जण प्रवास करत होते. शनिवारी रात्री 12 वाजता बस डौकी भागात आली असता अचानक अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेले रेलिंग तोडून दरीत कोसळली.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात 13 जण गंभीर जखमी झाले असून अन्य काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.