शास्त्री व कोहलीच्या अटकेची मागणी

नवी दिल्ली – पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बायोबबलचा भंग केल्यामुळेच रवी शास्त्री यांना करोनाची बाधा झाली. कर्णधार विराट कोहलीनेही शास्त्री यांच्यासह करोनाच्या नियमांचा भंग केला. त्यामुळेच पाचवी कसोटी रद्द करावी लागली. त्यामुळे या दोघांनाही अटक करावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत आहे.

शास्त्री, भरत अरुण व नितीन पटेल यांना करोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना विलगीकरणात पाठवले गेले होते. त्यांचे सहायक प्रशिक्षक योगेश परमारदेखील करोनाबाधित असल्याचे आढळले व पाचव्या कसोटीवर संकट आले.

या सगळ्याला शास्त्री यांनी करोना नियमांचा भंग केला हेच कारण आहे. त्यामुळे त्यांना आणि कोहलीलाही अटक करा, अशी मागणी होत आहे. कोहलीनेही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याबाबत बीसीसीआयकडून परवानगी घेतलेली नव्हती.

या मालिकेमध्ये भारताने 2-1 ची आघाडी घेतली असून, पाचव्या कसोटीसह या मालिकेचाही निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.