न्यूयॉर्क – करोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट सध्याच्या इतर व्हायरसपेक्षा अधिक गंभीर आजाराचे कारण होऊ शकतो. करोनाचा डेल्टा व्हेरिएंट कांजण्यांप्रमाणं सहजपणे संसर्गित होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.
अमेरिकेच्या आरोग्य प्राधिकरणाच्या अंतर्गत कागदपत्रांचा हवाला देत अमेरिकन माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (सीडीसी) एका रिपोर्टमधील कागदपत्राचा हवाला देण्यात आला आहे.
ज्या लोकांनी लसीचे सर्व डोस घेतले आहेत ते लोक करोनाची लस न घेतलेल्या व्यक्तीप्रमाण करोनाच्या डेल्टा व्हेरिएंचा संसर्ग करु शकतात, असे कागदपत्रातील अप्रकाशित आकडेवारीच्या आधारावर दिसून आले आहे.
द वॉशिंग्टन पोस्ट ने सर्व प्रथम अप्रकाशित अहवालाच्या आधारे बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल पी. व्हॅलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितलं की, लस न घेतलेल्या व्यक्तींप्रमाणं ज्यांना लस मिळाली आहे, त्यांच्या नाक आणि घशात विषाणू असू शकतो.
सीडीसीकडील अंतर्गत कागदपत्रांतून डेल्टा व्हेरिएंटच्या काही गंभीर लक्षणांकडं लक्ष वेधण्यात आलं आहे. कागदपत्रातील माहितीनुसार डेल्टा व्हेरिएंट मर्स, सार्स, इबोला, सर्दी, फ्लू आणि ताप या आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतो. डेल्टा व्हेरिएंट कांजिण्यासारखा मोठ्या प्रमाणात संसर्ग करतो, असंही सांगण्यात आलं आहे. सीडीसीच्या कागदपत्राची एक प्रत न्यूयॉर्क टाइम्सला देखील मिळाली आहे.