Delhi Pollution – गेले काही दिवस दिल्लीच्या हवेची (Delhi Pollution) गुणवत्ता काहीशी सुधारली होती पण आज पुन्हा ही हवेच्या प्रदुषणाची पातळी (Delhi Pollution) गंभीर अवस्थेत पोहचली आहे.
शुक्रवारी ही पातळी’अत्यंत खराब’ श्रेणीत राहिली, अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक 350 पेक्षा जास्त नोंदवला गेला. सकाळच्यावेळेत हा निर्देशांक तब्बल 388 वर गेला होता. ही पातळी धोकादायक मानली जात आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, आनंद विहारमधील हवा गुणवत्ता निर्देशांक 411 होता, तर अलीपूर, वजीरपूर आणि आरके पुरममध्ये अनुक्रमे 432, 443 आणि 422 या ‘गंभीर’ श्रेणीत नोंदवला गेला.
0 ते 100 पर्यंतचा हवा गुणवत्ता निर्देशांक ‘चांगला’, 100 ते 200 ‘मध्यम’, 200 ते 300 ‘खराब’, 300 ते 400 ‘अत्यंत खराब’ आणि 400 ते 500 किंवा त्याहून अधिक ‘गंभीर’ मानला जातो.
मध्यंतरीच्या काळात दिल्लीतील प्रदुषणामुळे जे निर्बंध घालण्यात आले होते ते काही प्रमाणात मागे घेण्यात आले होते. तसेच त्या परिसरात घालण्यात आलेली बांधकामावरील बंदी उठवण्यात आली होती. परंतु आता पुन्हा नोंदवलेल्या गंभीर परिणमांमुळे हे निर्बंध नव्याने लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.