मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. नागिन आणि नौकर बीवी का सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शक-निर्माते राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे मुंबईत निधन झाले. अरमान कोहलीचे वडील आणि त्यांच्या काळातील प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माते राजकुमार कोहली यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.(Bollywood News)
1963 मध्ये निर्माता आणि 1973 मध्ये दिग्दर्शक म्हणून सुपरहिट चित्रपट देणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजकुमार कोहली यांनी धर्मेंद्र, जितेंद्र, हेमा मालिनी, सनी देओल, अक्षय कुमार आणि राज बब्बर यांच्यासह अनेक कलाकारांसोबत काम केले. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. (Rajkumar Kohli passed away)
एका इंग्रजी वृत्त वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, राजकुमार कोहली यांचे शुक्रवारी सकाळी ८ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. राजकुमार कोहलीचा जन्म 14 सप्टेंबर 1930 रोजी झाला होता.(bollywood star)
त्यांची पत्नी निशी कोहली हिंदी आणि पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याशिवाय 1992 मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा अरमान कोहलीची इंडस्ट्रीला ओळख करून दिली. राजकुमार कोहलीने 1992 मध्ये रिलीज झालेल्या ‘विरोधी’ या सिनेमातून मुलगा अरमानला लॉन्च केले. या चित्रपटात त्यांच्या विरुद्ध हर्षा मेहरा मुख्य भूमिकेत दिसली होती.
राजकुमार कोहलीने 1963 मध्ये निर्माता म्हणून करिअरला सुरुवात केली. 1963 मध्ये त्यांनी ‘पिंड दी कुडी’ आणि ‘सपनी’ या पंजाबी चित्रपटांची निर्मिती केली. यानंतर त्यांनी गोरा और काला, डंका, दुल्ला भट्टी, मैं जट्टी पंजाब दी या चित्रपटांची निर्मिती केली.
दिग्दर्शक म्हणून त्यांनी स्वत:ची मोठी आणि वेगळी ओळख निर्माण केली. 1973 साली ‘कहानी हम सबकी’ मधून दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या राजकुमार कोहलीने आपल्या करिअरमध्ये नागिन, मुकाबला, जानी दुश्मन, बदले की आग, इन्सानियत का दुश्मन,एक: अनोखी कहानी यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले.