Delhi Liquor Policy Scam : दिल्ली मद्यधोरण भ्रष्टाचार प्रकरणी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. याला उत्तर देताना आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांनी ईडीवर टीका केली. त्यांनी ‘माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाकडे लक्ष देत आहे, ईडीची भूमिका आणि आरोप कमकुवत आहेत आणि न्यायालयासमोरखोटे पडत आहेत, दरम्यन, येत्या पाच दिवसात सर्व काही ठीक होईल” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
संजय सिंह यांच्या अटकेवर बोलताना सोमनाथ भारती म्हणाले, ‘ईडीचा पीएमएलए कायदा असा आहे की त्याअंतर्गत ईडीला कस्टडी मिळते पण ईडीकडे न्यायालयाच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. ज्या लोकांच्या जबाब एजन्सीने न्यायालयात पाठवले आहे त्यांचा जबाब विश्वसनीय नसून न्यायालयात ते पूर्व आरोप खोटे पडतील असेही त्यांनी म्हटले.
आप खासदाराच्या खटल्याचे कामकाज पाहणारे अधिवक्ता सोमनाथ भारती पुढे म्हणाले, ईडीला दिलेल्या याआधीच्या निवेदनात दिनेश अरोरा यांनी स्वेच्छेने कबूल केले की त्यांनी संजय सिंह यांना कधीही पैसे दिले नाहीत, मग आता काय झाले की ते सरकारी साक्षीदार बनताच संजय सिंगचे नाव घेतले. ईडी आणि अरोरा यांच्यात असे काय घडले की त्यांनी संजय सिंह यांच्यावर असे आरोप केले? असा सवाल देखील त्यांनी केला.
आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी आरोप केला आहे की, सरकारने दिनेश अरोरा यांच्या कुटुंबाला कथितपणे धमकावले त्यामुळे ते सरकारी साक्षीदार होण्यास तयार झाले. हे संपूर्ण प्रकरण निराधार आहे. ईडीचे सर्व आरोप निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. सरकार संजय सिंह यांना त्रास देत आहे.
दरम्यान, आप खासदार संजय सिंह यांना गुरुवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. येथे न्यायालयाने त्यांना चौकशीसाठी ५ दिवसांची कोठडी सुनावली. संजय सिंह कोर्टात म्हणाले, ‘ईडीचे अधिकारी त्याच्यासोबत गैरवर्तन करत आहेत.’