अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणात ससून हॉस्पिटलचे संबंधित जबाबदार वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कारवाई होणे करिता खेड विशेष कोर्टात विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी अर्ज केला आहे
बहुचर्चित कुप्रसिद्ध अंमली पदार्थ तस्कर ललित अनिल पाटील व साथीदार यांच्या वर 2020 मध्ये 132 किलो मेथ एम्प्टमाईन चे उत्पादन करून विक्री केले बद्दलच्या चाकण पोलीस स्टेशन येथील खटल्यात आज खेड येथील विशेष अंमली पदार्थ व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात आज सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील ऍड शिशिर हिरे यांनी तातडीने अंमली पदार्थ विरोधी कायदा कलम 25,29.. नुसार
आज दाखल करून आरोपी ललित पाटील याला ससून हॉस्पिटल च्या अंतर्गत येनाऱ्या रुग्णालय जेल कक्षातून अंमली पदार्थां चा व्यापार करण्याची मुभा दिली, आरोपीस कोणत्याही सबळ करणा शिवाय हॉस्पिटलमध्ये आश्रय दिला, म्हणूंन विद्यमान खटल्यात गुन्हेगारी प्रक्रिया संहिता कलम 311 नुसार संबंधित हॉस्पिटल चे जबाबदार अधिकारी, वैद्यकीय अधिकरि जेल चे डॉक्टर यांना आरोपीं म्हणून जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी केली आहे.
या शिवाय संबंधितां कडून फरार आरोपी ललित पाटील यांचे संपूर्ण जेल रेकॉर्ड, हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी भरती असल्याचे रेकॉर्ड , हालचाल नोंद वही मागविण्या बाबत हा स्वतंत्र अर्ज दाखल करून मा विशेष न्यायाधीश यांचे कडे ऍड हिरे यांनी या दोन्ही अर्जा वर युक्तिवाद केला’ ‘ , युक्तिवादादरम्यान ऍड हिरे यांनी ससून हॉस्पिटल मध्ये चालणारे गैरप्रकार थाम्बविण्या साठी कडक भूमिका घेण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. सदर अर्जा वर इतर आरोपीं चे म्हणणे घेण्यासाठी सदर चे प्रकरण आत्ता पुढील सुनावणी साठी 9 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आले आहे.