मुंबई – मुसळधार पावसानंतर यमुनेच्या पाण्याची पातळी वाढली आणि दिल्लीला जोडणारे अनेक महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेले. या संकटातून माणूस कसा तरी सुटला पण अनेक प्राणी त्यात अडकून पडले आहेत. आपत्ती बचाव पथकांकडून नोएडामध्ये अडकलेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. प्राण्यांना पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी नेले जात आहे. जलमग्न भागातून सुरक्षित स्थळी आणलेल्या प्राण्यांमध्ये ‘प्रीतम’ प्रजातीचा एक बैलही आहे, ज्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. त्याची किंमत BMW X5 पेक्षा जास्त आहे. म्हणजे तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक आहे.
गाझियाबादमधील एनडीआरएफ 8 व्या बटालियनने गुरे आणि शेळ्यांना वाचवणाऱ्या टीमचे काही फोटो आणि व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केले आहेत. ‘गाझियाबादच्या एनडीआरएफच्या टीमने नोएडा येथून 1 कोटी रुपये किमतीच्या बैलाचे प्राण वाचवून त्याला सुरक्षित स्थळी पाठवले आहे.
टीमने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये दोन म्हशी पुराच्या पाण्यातून जाताना बोटीच्या दोन्ही बाजूला कर्मचाऱ्यांनी पकडून ठेवल्या आहेत. नोएडातील यमुना नदीकाठी सुमारे 550 हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे, 5,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत आणि आठ गावे प्रभावित झाली आहेत.
#आपदासेवासदैवसर्वत्र#animalrescue @8NdrfGhaziabad
एनडीआरएफ की तात्कालिक तकनीकों के प्रयोग से लाइफ बॉय बनी बेजुबानों की मददगार..@ANI @ndmaindia @NDRFHQ @PIBHomeAffairs @PMOIndia pic.twitter.com/msSkqDEKr0— 8th BN NDRF (@8NdrfGhaziabad) July 15, 2023
समोर आलेल्या माहितीनुसार एनडीआरएफने गुरुवारपासून कुत्रे, ससे, बदके, कोंबडा आणि गिनी डुकरांसह सुमारे 6,000 प्राण्यांना बुडीत भागातून सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. 45 वर्षांचा विक्रम मोडत नदीच्या पाण्याची पातळी यंदा 207.68 मीटरवर आली आहे.