देहूरोड, (वार्ताहर) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आयुक्तलयाअंतर्गत असलेल्या देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी (दि. १२) सकाळी अकरा ते साडेबाराच्या दरम्यान हद्दीत पथसंचलन कऱण्यात आले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील शिवाजी विद्यालयापासून पथसंचलनाची सुरुवात करण्यात आली. जामा मस्जीद, स्वामी विवेकानंद चौक, मेन बाजार पेठ, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, भाजी मंडई, रेल्वे स्थानक, सवाना चौक, नेटके कॉलनी, विस्डम शाळा, विकासनगर मार्गे मुकाई चौक येथे या संचलनाची सांगता करण्यात आली.
या पथसंचलनामध्ये ५ पोलीस निरीक्षक, ११ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, देहूरोड, रावेत, शिरगाव, तळेगाव पोलीस ठाण्यातील १०७ पोलीस अंमलदार, मुख्यालयातील २ दंगल नियंत्रण पोलीस पथक (आरसीपी ), रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे ८३० क्र. कंपनी असे एकूण १७ अधिकारी आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील गस्त पथक , देहूरोड, रावेत, शिरगाव व तळेगाव पोलीस ठाण्यातील ७ वाहने व १ मोबाइल वाहनाचा समावेश होता, अशी माहिती देहूरोड पोलिस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघमारे यांनी दिली.