पिंपरी – विठोबा-रखुमाई मुक्ती आंदोलनाच्या वतीने येत्या सोमवारी (दि. 6) वारकरी कीर्तनकार परिषद आयोजित केली आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
देहूगाव, परंडवाल चौकातील संतकृपा लॉनमध्ये ही परिषद दुपारी 2 वाजता होणार आहे. या परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून डॉ. भारत पाटणकर, हभप डॉ. सुहास फडतरे महाराज, धनाजी गुरव, हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, सचिन परब, हभप ताई महाराज उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमास आमदार सुनील शेळके, देहूगावच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण उपस्थित रहाणार आहेत. संपत देसाई, विजय मांडके, मोहन अनपट, अंकुश शेडगे, चैतन्य दळवी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले आहे.