पुणे- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी ते औंध परिसरातील सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) आयोजित “पॅनेक्स-21′ या “बिम्स्टेक’ राष्ट्रांचा संयुक्त सराव कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
भारतीय लष्करातर्फे पुण्यातील सीएमई येथे 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत भारत, बांग्लादेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, नेपाल आणि भूतान ही सदस्य राष्ट्रे असलेल्या “बिम्स्टेक’ या संघटनेचे “आपत्ती व्यवस्थापन आणि परस्पर सामंजस्य’ या विषयावरील सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमप्रसंगी “बिम्स्टेक’ राष्ट्रांचे प्रतिनिधी आणि लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हेदेखील उपस्थित असतील. यापूर्वी “आपत्ती’ व्यवस्थापन विषयावर “डीएमएक्स’ हा संयुक्त सराव 2017- दिल्ली आणि 2020 मध्ये पुरी येथे झाला होता.