वॉशिंग्टन – मॅनहटन येथील युनियन स्क्वेअरमध्ये असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केल्याने भारतीय अमेरीकेन समाजाला धक्का बसला असून निराशा पसरली आहे.
या घटनेचा भारतीय दुतावासाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारताच्या राजदूतांनी एक निवेदन देऊन आपला संताप व्यक्त केला आहे. हा प्रकार स्थानिक प्रशासन आणि अमेरििकेच्या गृह खात्याकडे नेण्यात आला आहे. या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी जबाबादार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
महात्माजींच्या 117 व्या जयंती निमित्त हा पुतळा गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाऊंडेशनने दोन ऑक्टोबर 1986ला भेट दिला होता. हा पुतळा 2001 मध्ये हलवून त्याचे संवर्धन करून एका उद्यानात त्याची पुनर्स्थापना 2002 मध्ये करण्यात आली होती.
गेल्या महिन्यात कॅलिफॅर्निया येथील उद्यानात असणाऱ्या आणखी एका पुतळ्याची नासधुस करण्यात आली होती. भारत सरकारने हा पुतळा सीटी ऑफ डेव्हीसला भेट दिला होता. भारतविरोधी शक्तींची निदर्शने सुरू असताना त्याचे अनावरण चार वर्षापुर्वी करण्यात आले होते.